Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अज्ञात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

माजलगाव - येथील बसस्थानकावर अज्ञात बेघर महिला अनेक दिवसांपासून आजारी होती. बसस्थानकातील कर्मचार्‍यांनी तिला (दि.13) रोजी सरकारी रुग्णालयात दाखल केले. 

पण तिची प्रकृती खालावल्याने तिचा आज उपचारादरम्यान मृत्यु झाला.

अधिक माहिती अशी कि, माजलगाव बसस्थानकावर एक अज्ञात बेघर महिला अनेक दिवसांपासून आजारी अवस्थेत होती. तिला येथील कर्मचार्‍यांनी (दि.13) रोजी सरकारी दवाखान्यात दाखल केले परंतु तिची प्रकृती खालावल्याने तिचा उपचारादरम्यान आज (दि.23) रोजी मृत्यु झाला आहे.

येथील पोलीस प्रशासनाने तिच्या नातेवाईकांना अनेक वेळा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते अद्याप देखील सापडले नाही तरी ह्या महिलेबद्दल कोणाला काही माहित असल्यास या नंबरवर संपर्क साधा 7588837774 असे आवाहन पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.

Sunday 24th of September 2023 09:24 AM

Advertisement

Advertisement