विडा येथे विद्यार्थी, शिक्षकांनी केला चांद्रयान - ३ देखावा
केज - विडा ( ता. केज ) येथील विद्या निकेतन इंग्लिश स्कूल या शाळेत गणेशशोत्सवानिमित्त शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी व त्यांच्यात नवनिर्मितीची संकल्पना रुजावी, जिज्ञासा निर्माण व्हावी. म्हणून चाद्रयांन - ३ चा देखावा तयार केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी इतर शाळेच्या विद्यार्थी, पालकांसह नागरिकांची गर्दी होत आहे. या शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याने शिक्षकांचे पालकांतून अभिनंदन होत आहे. देखावा तयार करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती कुलकर्णी, शिक्षिका प्रणवी देशमुख, प्रतीक्षा देशमुख, प्रतीक्षा घुटे, दीक्षा वाघमारे, रुपाली देशमुख, मस्कर, निकम यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल विठ्ठल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.