वक्रतुंड गणेश मंडळातर्फे सांप्रदायिक, सांस्कृतिक, आरोग्य शिबिराचे आयोजन
केज - केज शहरातील वक्रतुंड गणेश मंडळ व वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सांप्रदायिक, सांस्कृतिक, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
केज शहरातील वक्रतुंड गणेश मंडळाने प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मंडळाच्या वतीने सात दिवसीय भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले. भागवताचार्य बाळू महाराज उगले हे रोज दुपारी २ ते ५ या वेळेत संगीतमय भागवत कथा सांगणार आहेत. तर रात्री ८ ते १० या वेळेत किर्तनकारांची किर्तनसेवा होणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे खेळ व महिलांसाठी संगीत खुर्ची व खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
पाच दिवस आरोग्य तपासणी शिबिर ठेवले असून आजारावर आधुनिक प्रकारे उपचार केले जाणार आहेत. आरोग्य तपासणीसाठी राजस्थान राज्यातील जोधपूर येथील ॲक्युप्रेशर रिसर्च ॲन्ड ट्रिटमेंट संस्थेचे पंजाब येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, ब्लड प्रेशर, मधुमेह, पॅरलेस, मोटापा, गॅस, कब्ज, मुळव्याध, त्वचांचे विकार, थायरॉईड अशा अनेक आजारांची ॲक्युप्रेशर, कपींग, वायब्रेशन थेरेपीनी तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. अशी माहिती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.