शिवसेना नेत्याच्या गाडीवर अज्ञाताची दगडफेक
केज - शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा राज्य समन्वयक ॲड. वैजनाथ वाघमारे हे उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती असून वाघमारे हे अहमदनगर येथील पक्षाची बैठक आटोपुन त्यांच्या गावी आडस ( ता. केज ) येथे निघाले होते. १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास केज - अंबाजोगाई रस्त्यावर होळ या शिवारात जिनिंगजवळ त्यांच्या कारवर ( एम. एच. ०१ बी. वाय. ९१४७ ) अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या त्यांच्या गाडीचीन काच फुटली असून त्यांचा मुलगा अनिकेत वाघमारे, पुतण्या महेश वाघमारे हे किरकोळ जखमी झाले आहेत. १८ सप्टेंबर रोजी ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रामदास काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संबधित आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, एसटी बससह इतर तीन - चार वाहनांवर दगडफेक झाल्याने त्या वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाल्याचे वाघमारे यांनी सांगितले.