पैशाच्या व्यवहारावरून मुकादमाने केले मध्यस्थी व्यक्तीचे अपहरण
केज - सांगवी ( ता. केज ) येथे वास्तव्यास असलेले दादाराव भीमराव गायकवाड यांनी मध्यस्थी करीत गतवर्षी चिखलबीड येथील मुकादम अनिल भाऊसाहेब वाघमारे यांच्याकडून उचल घेऊन त्यांना दोन कोयते लावून दिले होते. १५ सप्टेंबर रोजी ९.३० वाजता मुकादम अनिल वाघमारे व त्यांचा मेव्हणा रतन श्रीराम काकडे ( रा. चिंचवटी ) हे दोघे दादाराव गायकवाड यांच्या घरी आले. त्यांनी तु लावून दिलेले कोयते पळून गेले आहेत. तु आमच्या सोबत नेकनूरला चल, ते कोयते गटतील अशी थाप मारून त्यांना कारमध्ये बसवून नेले. त्यानंतर रात्री १०.३० वाजता दादाराव गायकवाड यांनी त्यांची पत्नी रुपाली गायकवाड हिस फोन करून ते दोघे कोल्हापूर येथील मुरगुडकडे घेऊन चालले असून त्यांनी कोयत्यासाठी दिलेले दीड लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाहीत. असे म्हणून फोन ठेवून दिला. त्यानंतर ते परत न आल्याने त्यांची पत्नी रुपाली गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल वाघमारे, रतन काकडे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार वैभव सारंग हे करीत आहेत.