Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक दुकान, आस्थापनेवर राष्ट्रध्वज उभारावा

बीड  : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत दि. 13  ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपल्या आस्थापनांवर राष्ट्रध्वज उभारावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री. गुं. मुंढे यांनी केले आहे.

शासनाच्या दि. 12.07.2022 रोजीच्या परिपत्रकान्वये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत " हर घर तिरंगा" हा उपक्रम व्यापक प्रमाणावर यशस्वीपणे राबविण्याच्या अनुषंगाने प्रधान सचिव (कामगार) यांच्या दालनात दि. 22 जुलै 2022 रोजी बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्थीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व दुकाने व आस्थापनांना राष्ट्रीय ध्वज लावण्याकरीता प्रेरित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपल्या आस्थापनांवर राष्ट्रध्वज उभारावा. मात्र, सदर उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते, अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री.  गुं. मुंढे यांनी केले आहे.

Friday 5th of August 2022 07:51 PM

Advertisement

Advertisement