Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आदिवासी विकास प्रकल्पाच्या 14 वसतिगृहांमध्ये प्रवेश योजना

  बीड - आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या चार जिल्ह्यातील 14 वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना  तालुका स्तरावर आठवीपासून पुढील प्रवेशाकरिता व जिल्हा स्तरावर 11 वी पासून नंतरच्या शिक्षणाकरिता शासकीय वसतिगृहात पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तरी याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

सन 2022-23 करिता पालकांचे घोषणापत्र व विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना खालील लिंकमध्ये देण्यात आलेल्या सुचनांची माहिती घेवून खबरदारी घ्यावी. https://drive.google.com/file/d/1uWMTNO ARcXZZI5 ppUaokCL3U RmfpU6e/view? usp=sharing तथापि, वसतिगृह प्रवेशासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरल्यानंतर संबंधित गृहप्रमुख/ गृहपाल यांच्याशी  तसेच 0240-2486069 वर  संपर्क साधावा.

Friday 5th of August 2022 07:49 PM

Advertisement

Advertisement