Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

डिघोळ अंबा सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी डिगांबर घुंडरे तर व्हाईस चेअरमनपदी अक्षय भुंबे यांची सर्वानुमते निवड

अंबाजोगाई -  तालुक्यातील डिघोळ अंबा सेवा सहकारी संस्थेसाठीची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. चेअरमनपदी डिगांबर मधुकर घुंडरे तर व्हाईस चेअरमनपदी अक्षय युवराज भुंबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. या निवडणूकीत पुढील उमेदवार निवडून आले. नवनिर्वाचित संचालकांची सोमवार, दिनांक २१ जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवनिर्वाचित संचालकांचा सभासदांकडून सत्कार करण्यात आला. तर यावेळेस डिघोळअंबा सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी डिगांबर मधुकर घुंडरे तर व्हाईस चेअरमनपदी अक्षय युवराज भुंबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अक्षय युवराज भुंबे हे ५०० पैकी २५१ मते घेवून विजयी झाले. अक्षय भुंबे हे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव म्हणून बीड जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर वंचित बहुजन आघाडीला बळकट करण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय नेते एॅड.प्रकाशजी आंबेडकर यांचे निष्ठावंत पाईक आहेत. भुंबे यांचे सामाजिक बांधिलकीतून कार्य सुरू आहे. आजपावेतो त्यांनी लोकलढा उभारून ३० भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी जमीन मिळवून दिली आहे. तसेच श्रमजिवी, मजूर व गरजूंना मोफत ई-श्रम कार्ड आणि कोविड लाॅकडाऊन काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटप केले आहे. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची नोंद घेवून डिघोळ अंबा ग्रामस्थांकडून त्यांना सेवा संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्य करण्याची संधी देण्यात येवून सर्वानुमते व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. भुंबे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.डी.म्हेञे यांच्यासह इतर सर्व कर्मचारीवृंद तसेच सचिव कल्याण औताडे यांनी काम पाहीले. तर  विजयासाठी सुभाष घुंडरे, बालाजी मुळे, एॅड.विकास भुरे, योगेश घुंडरे आदी मान्यवरांसह डिघोळ अंबा ग्रामस्थांचे सहकार्य, मार्गदर्शन व आशिर्वाद लाभले. अशी माहिती देवून नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन अक्षय भुंबे यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Wednesday 22nd of June 2022 08:00 PM

Advertisement

Advertisement