Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सौ.के.एस.के.महाविद्यालयात पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित

बीड(प्रतिनिधी)ः  सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथे नुकतेच पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर भूगोल विभागाच्या मार्फत बीड शहरातील दैनिक पर्जन्यमान मोजण्यासाठी हे यंत्र बसविण्यात आले आहे. या पर्जन्य मापकाच्या दैनिक नोंदी बीड शहरातील जनतेसाठी, कृषी व्यावसायिकांसाठी संशोधकासाठी, विविध कार्यालयासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहेत.या उपक्रमांचे उद्घाटन मा.प्राचार्य डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतिष माऊलगे,कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,भूगोल विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ.बालासाहेब पोटे, प्रा.डॉ.ए.डी.चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते. 

Wednesday 22nd of June 2022 04:14 PM

Advertisement

Advertisement