माजलगांव तालुक्यातील १२ वी गुणवंत विध्यार्थांचा गुणगौरव सोहळा
माजलगांव(प्रतिनिधी)
माजलगांव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. प्रकाश दादा सोळंके व माजलगांव मतदारसंघाचे युवा नेतृत्व तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग भैय्यासाहेब सोळंके यांच्या संकल्पनेतुन व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने माजलगांव तालुक्यातील विविध महाविद्यालयातील इयत्ता १२ वीच्या विविध शाखेच्या उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थांचा गुण गौरव सोहळा शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात संपन्न झाला या सोहळ्यास सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्रचार्य.डॉ. सानप सर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दयानंदजी स्वामी साहेब,माजी जि.प.सदस्य प्रकाश गवते सर,माजी नगरसेवक राहुल लंगडे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या तालुकाध्यक्ष संध्या ताई भांडेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश मेंडके,राष्ट्रवादी काँग्रेसचे आल्पसंख्याक शहराध्यक्ष सुल्तान मसुरी,रा.काँ.तालुका सरचिटणीस अँड प्रमोद तौर,फेरोज पठान ,राजु कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष क्षितिज गायकवाड,रा.काँ.शहरपाध्यक्ष अभिजीत जाधव, रा.वि.काँ.शहरसरचिटणिस निहाल खान,रा.वि.काँ शहर संघटक नकुल मगर,राजेश बादाडे आदींनी केले होते.
