Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

निरोगी आरोग्यासाठी नियमीत योगासने, प्राणायामाची आवश्यकता

बीड दि.२१(प्रतिनिधी):- नियमीत योगसाधना करत असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. योगासनामुळे आरोग्य निरोगी राहातं आणि हे नेहमीच मानण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर तुम्हाला योगाचा नक्कीच फायदा करून घेता येतो. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक असल्याचे प्रतिपादन योगप्रशिक्षक विष्णूदास बियाणी यांनी केले.
जागतिक योग दिनानिमित्त मंगळवार दिनांक २१ जून २०२२ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा रुग्णालयातील  अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक यांच्या उपस्थितीत  योग, ध्यानधारणा शिबिराचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून योग धारणा ध्यान धारणा शिबिरातील आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सुरेश साबळे,  डॉ, कुलकर्णी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य बेदरे मॅडम,  योग प्रशिक्षक विष्णुदास बियाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या  प्रारंभी  धन्वंतरीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना विष्णूदास बियाणी यांनी योग आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात  कोणती आसनं रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही तुम्ही करू शकता हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. योगासनाचे प्रकार योगाची सर्वात अंतिम अवस्था समाधीला राजयोग असं म्हणतात. या योगाला सर्व योगांमध्ये राजा मानण्यात येते. कारण यामध्ये सर्व प्रकारच्या योगांमध्ये काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. रोजच्या आयुष्यात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून नक्की आत्मनिरीक्षण करा आणि योगसाधना करायला हवी. राजयोगाचे साधारण 8 प्रकार सांगण्यात आले आहेत.यम (शपथ घेणे), नियम (आत्म अनुशासन), आसन (मुद्रा), प्राणायम (श्वास नियंत्रण), प्रत्याहार (इंद्रियांवर नियंत्रण), धारणा (एकाग्रता), ध्यान (ध्यानधारणा), समाधी (बंधनांपासून मुक्ती अथवा परत्माम्याशी मिलन). ज्ञान योगाला बुद्धीचा मार्ग समजण्यात येतो. हे ज्ञान आणि स्वतःबाबत जाणून घेण्यासाठी हा योगाचा उत्तम मार्ग आहे. याच्याद्वारे अज्ञानी माणसांना बुद्धी मिळते. तसंच यामुळे आत्म्याचीही शुद्धी होते असं म्हटलं जातं. चिंतन करताना शुद्ध स्वरूपात ज्ञानाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच ज्ञान योग. तसंच योगाचे अध्ययन करून बुद्धीचा विकास करता येतो. ज्ञान योग सर्वात कठीण मानला जातो. शेवटी ज्ञानच शेवटपर्यंत टिकते असं म्हटले जाते. ज्ञानापेक्षा अधिक मोठे काहीच नाही. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे की, ‘योगः कर्मसु कौशलम्’ अर्थात कुशलतापूर्वक काम करणे हाच योग आहे. कर्म योगाचा सिद्धांत आहे जो वर्तमानात आपण सर्वच अनुभवतो. तो म्हणजे आपले आयुष्य हे कर्मावर आधारित असते. कर्म योगाद्वारे मनुष्य कोणत्याही मोह – मायेमध्ये न फसता सांसारिक कार्य करतात आणि शेवटी परमेश्वरामध्ये लीन होतात. गृहस्थ लोकांसाठी हे उपयुक्त ठरले आहे. कर्म कोट्स आपण जाणून घेतलेच आहेत. पण योगामध्येही कर्माला अधिक महत्त्व आहे. भक्ती अर्थात दिव्य प्रेम आणि योगाशी जुळणे. ईश्वर, सृष्टी, प्राणी, पशु, पक्षी इत्यादींबाबत प्रेम, समर्पण भाव आणि निष्ठा यालाच भक्ती योग असं म्हणतात. भक्ती योगासाठी कोणत्याही वय, धर्म, राष्ट्र, निर्धन आणि श्रीमंत व्यक्ती असा भेदभाव करता येत नाही. प्रत्येक जण कोणा ना कोणाला तरी आपला देव मानत त्याची पूजा करतात. यालाच भक्ती योग असं म्हटलं जातं. भक्ती ही नेहमीच निस्वार्थ भावाने केली जाते. जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्देश मिळवू शकतात. हठ योग हे प्राचीन भारतीय साधना पद्धत आहे. हठ मधील ह अर्थात हकार आणि उजव्या नासिकेतील स्वर जसे पिंगला नाडी असे म्हणतात. तर ठ अर्थात ठकार अर्थात डाव्या बाजूचा नासिका स्वर ज्याला इडा नाडी असं म्हटलं जातं. योग दोन्ही जोडण्याचे काम करतो. हट योगाद्वारे दोन्ही नाड्यांदरम्यान संतुलन राखण्यास मदत मिळते. असं मानलं जातं की, प्राचीन काळात ऋषी मुनी हे हठ योगा करत होते. या दिवसात हठ योगाची अधिक प्रचिती येत आहे. हे करण्यामुळे मनाला शांती मिळते आणि आरोग्य अधिक चांगले होते. योगानुसार मानवाच्या शरीरामध्ये सात चक्र असतात. जेव्हा ध्यानधारणा केली जाते तेव्हा ध्यानाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृत करण्यात येते. यामुळे शक्ती जागृत होऊन मस्तिष्काच्या दिशेने जाते आणि या दरम्यान सर्व सात चक्रांमध्ये क्रियाशील होते. ही प्रक्रिया करण्यात येते त्याला कुंडलिनी आणि लय योग असे म्हणतात. यामध्ये मनुष्य बाहेरच्या बंधनातून मुक्त होऊन शरीराच्या आत निर्माण होणार्या शब्दांना समजण्याचा प्रयत्न करतात. ज्याला नाद असे म्हणतात. या प्रकारच्या अभ्यासाने मनाची चंचलता नष्ट होते आणि एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. योग तीन स्तरांवर काम करते ज्यामुळे तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. योग्य स्वरूपात आणि योग्य प्रकारे योग करणे आरोग्यासाठी  अधिक फायदेशीर ठरते. योगासनाचे ( नक्की काय फायदे आहेत जाणून घ्या – पहिल्या चरणामध्ये योग मनुष्याला स्वास्थ्यवर्धक बनवते आणि त्यामध्ये ऊर्जा भरण्याचे काम करते दुसऱ्या चरणामध्ये योगा हे मस्तिष्क आणि विचारांवर परिणाम करते. आपल्यातील नकारात्मक विचार असतात, जे आपल्याला तणाव आणि चिंता देतात अथवा आपल्या आयुष्यात मानसिक विकारासाठी प्रवृत्त ठरतात. योग या चक्रातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते तर तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण चरणामध्ये पोहचून मनुष्य सर्व चिंतापासून मुक्त होतो. योगाच्या या अंतिम चरणापर्यंत पोहचण्यासाठी कठीण परिश्रमाची गरज असते. या प्रकाराच्या योगाचे फायदे हे विविध स्तरावर तुम्हाला पाहायला मिळतात नियमित योगा करण्याचे फायदे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योगा हा नक्कीच चांगला उपाय आहे. पाहूया काय आहेत योगा करण्याचे फायदे –ताणतणावपासून मुक्ती – आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.
शरीरातील साखरेवर नियंत्रण – आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी – आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बऱ्याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही. रक्ताभिसरण चांगलं होतं – योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तऱ्हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते. म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी – तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावं लागतं. योगा करण्याची योग्य पद्धत ध्यान, ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिट्स तुम्ही ध्यान लावून बसलात की, तुमच्या मन आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहतं. तसंच पूर्ण दिवस तुमचं मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहातं. शिवाय दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते. नाडी शोधन प्राणायाम आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी योगामध्ये नाडी शोधन प्राणायम करण्यात येतं. प्राणायमप्रमाणेच यामध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचं असतो. हा योगप्रकरा अनुलोम – विलोम या नावानेदेखील ओळखला जातो. अनुलोम विलोमचे फायदे शरीराला मिळतात. शरीरासाठी अतिशय फायदेशीर असं हे प्राणायम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कसब येते.शलभासन बऱ्याच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा खूपच त्रास असतो. विशेषतः महिलांना. गरोदरपणानंतर तर हा त्रास सर्रास होतो. या आसनामुळे तुमच्या कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. शिवाय तुमच्या पाठीमध्ये आणि कंबरेत कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत असेल तर हे आसन तुम्ही रोज करायला हवं. हे रोज करून तुम्हाला स्वतःलाच स्वतःमधील बदल जाणवेल. भुजंगासन तुमची छाती आणि तुमच्या शरीरातील मांसपेशी लवचिक बनवण्यासाठी आणि कंबरेत आलेला तणाव दूर करण्यासाठी हे आसन अप्रतिम आहे. मेरूदंडसंबंधित आजारी व्यक्तींनी हे आसन केल्यास, त्याना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शिवाय महिलांमध्ये गर्भाशयातील रक्ताभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठीदेखील या आसनाची मदत होते. तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत चालणेही गरजेचे असते. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी सोपे उपाय यामध्येही काही खास आसनांचा समावेश असतो.  
अर्धचक्रासन तुम्हाला मधुमेह अथवा साखरेचा कोणताही आजार वा पोटावरील चरबीपासून सुटका हवी असेल तर अर्धचक्रासन हा उत्कृष्ट पर्याय आहे. याबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की, ज्या व्यक्तींना हाडासंबंधी कोणतीही गंभीर तक्रार असेल, त्या व्यक्तींनी हे आसन अजिबात करू नये आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब अथवा मानसिक कोणताही आजार असेल त्यांनीही या आसनापासून दूरच राहावं. केवळ मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.  योगा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर, यामुळे तुमच्या शरीराला एक योग्य कसरत होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाकी सगळं मिळतं पण आपण स्वतःच्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत. व्यायामाचे, योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर राहतो. इतकंच नाही तर माणसाचे वजन, हाडं, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय तुम्ही नियमित योगा केलात तर कोणत्याही आजारापासून तुम्ही दूर राहू शकता असे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगून योगाची विविध योग आसणे प्रात्यक्षिकासह करून दाखविली तर यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स नर्सेस ब्रदर सिस्टर रुग्ण नातेवाईक यांच्या शहर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Wednesday 22nd of June 2022 02:30 PM

Advertisement

Advertisement