दोन दुचाकींची चोरी
बीड : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे. गेवराई तालुक्यातील गढी येथे जय भवानी कारखाना परिसरातून सुदाम बाबुराव गोरे (रा. रोहीतळ) यांची तीस हजाराची दुचाकी (क्र.एम.एच.23 आर.7389) चोरट्याने लंपास केली. 14 मे रोजी दुपारी ही घटना घडली. गेवराई ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला. दुसरी घटना धारुर ठाणे हद्दीतील आडस येथे शनिवारी दुपारी घडली. हरिदास शामराव लोमटे (रा.भावठाणा ता.अंबाजोगाई) यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.44 व्ही 5727) चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली.
Tuesday 17th of May 2022 09:39 PM
