Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ट्रक चालकाचे मोबाईल लांबवणारा चोरटा पकडला

बीड: तालुक्यातील समनापूर शिवारात ट्रक उभा करुन कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाला जिवे मारण्याची धमकी देत तीन चोरट्यांनी चालकाकडील 20 हजार 300 रुपयांचे दोन मोबाईल बळजबरीने काढून घेत पलायन केले. यावेळी ट्रक चालक अजय दिवान शिंदे (रा.मांगी ता.करमाळा जि.सोलापूर) याने व परिसरातील लोकांनी त्या चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. यावेळी बाळासाहेब लोणके (रा.बीड) हा खाली पडल्याने त्यास चालकाने पकडले.  दरम्यान रवि कांबळे व कृष्णा मोहारे (रा.दोघे रा.बीड) हे अंधाराचा फायदा घेवून पळाले. 16 मे रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक चालकाच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Tuesday 17th of May 2022 09:38 PM

Advertisement

Advertisement