Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ग्रामसेवकाचा पारदर्शक कारभार गावाला आदर्श बनवू शकतो - सखाराम काशीद

 बीड (प्रतिनिधी) आदर्श गाव बनवण्याची जबाबदारी कोणा एकाची नाही. नागरिक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक हे सर्व एकत्र आले तर गावांचा निश्चितच कायापालट होऊ शकतो. कोळवाडी सह अनेक गावे विकास काम घेऊन पुढे आली आहेत. तेथे नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा ठरला, असे प्रतिपादन आदर्श ग्रामसेवक सखाराम काशीद यांनी केले.
           भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना "ग्रामपंचायतीचे कामकाज" याविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जेव्हा सर्वांना पारदर्शक कारभार दिसतो तेंव्हा सर्व ग्रामस्थ प्रशासनाला मदत करतात. गावाचा कायापालट त्यातूनच होतं असतो. मात्र अशा वेळी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व समित्यांचे पदाधिकारी,  शाळांची भूमिका देखील महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले.
          ग्रामपंचायतीचा एकूण कारभार मोठ्या प्रमाणात असून सर्व स्तरावर जनतेने मदत केली, तर सर्वांगीण विकास साधता येतो. मात्र बऱ्याच ठिकाणी जनता आपला सहभाग नोंदवत नसल्याने काम पुढे जात नसल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
           जनआंदोलनाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तीन दिवसाच्या प्रशिक्षण काळामध्ये या विषयावर महत्त्वपूर्ण असे व्याख्यान काशीद यांनी दिले. यावेळी अँड. अजित देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuesday 17th of May 2022 03:18 PM

Advertisement

Advertisement