Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पात्र तृतीयपंथीयांना ओळख प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन

 बीड : तृतीयपंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्याकरीता नॅशनल पोर्टल फोर ट्रांसजेंडर पर्सन (National Portal For Transgender persos) या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

            तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत जिल्हास्तरीय समिती द्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजवीज आहे. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार, यांच्या मार्फत राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फोर ट्रांसजेंडर पर्सन (National Portal For Transgender  persos) या वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज ( Applu Online ) यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाइन अर्जासोबत ओळखपत्र साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आधार कार्ड,आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र( बॉन्ड), शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ यांनी दिलेला व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावेत, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Friday 13th of May 2022 05:04 PM

Advertisement

Advertisement