Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

साबला येथील अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

  केज (प्रतिनिधी) : केज विधानसभा मतदार संघाचे युवा नेते अक्षय ( भैय्या ) मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त साबला गावातील सर्व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .            

   ताई सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष नरहरी काकडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव काकडे,  प्रमुख पाहुणे धनंजय धाट (मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साबला), सोनाजी काकडे  (सहशिक्षक समर्थ माध्यमिक विद्यालय , तरनळी), प्रमुख उपस्थिती उमाशंकर ( आण्णा ) शिंदे - (निवृत्त सहाय्यक फौजदार पोलिस स्टेशन केज), महादेव कटारे (सरपंच ग्रामपंचायत कार्यालय साबला), काशिनाथ नाईकनवरे (उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय साबला), श्रीमंत नाईकनवरे , मुरलीधर रोकडे (चेरमन सावित्रीबाई फुले बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित साबला) इत्यादी मान्यवर मंडळीच्या हस्ते गावातील सर्व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .                      प्रास्ताविक करत असताना ताई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहरी काकडे यांनी अक्षय (भैय्या) मुंदडा यांच्या वाढदिवसा निमित्त मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की केज विधान सभा मतदार संघात तसेच साबला गावात जी काही विकास कामे केली त्या सर्व कामाचे श्रेय स्वर्गीय विमलताई मुंदडा तसेच  नंदकिशोरजी मुंदडा आणि युवा नेते अक्षय ( भैय्या ) मुंदडा यांना दिले. तसेच अक्षय ( भैय्या ) मुंदडा यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव काकडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना असे म्हटले की केज आणि अंबाजोगाई शहराचा आणि ग्रामीण भागाचा खरा  विकास जर कोणी केला असेल तर तो या मुंदडा परिवाराने केला अशा शब्दात केलेल्या कामाचे कौतुक ही केले आणि यानंतर अशाच प्रकारची विकास कामे त्यांच्या हातून व्हावीत म्हणून अक्षय भैय्या मुंदडा आणि त्यांच्या कुटुंबातीलं सर्व सदस्य यांचे आयुष्य निरोगी राहो अशी सर्वांच्या साक्षीने ईश्वर चरणी प्रार्थना केली .                 या कार्यक्रमासाठी गावातील सर्व तरुण सहकारी मित्रमंडळी उपस्थित होते . त्यामध्ये अशोक काकडे , ज्ञानेश्वर पांचाळ , रामदास मुळे , रामराजे शिंदे , महादेव काकडे , पोपट काकडे , विश्वनाथ नाईकनवरे , अविनाश पुरी , सोपान नाईकनवरे , ओम काकडे , आकाश काकडे , उध्दवराव नाईकनवरे , रामराजे काकडे , अभिमान नाईकनवरे , गणेश काकडे , सोपान नईकनवरे  , सदाशिव परळकर साबला गावातील इत्यादी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  नरहरी काकडे यांनी केले तर आभार अशोक काकडे यांनी मानले .

Friday 13th of May 2022 03:57 PM

Advertisement

Advertisement