कमलबाई शिंदे यांचे निधन
तालुक्यातील लवूळ येथील रहीवाशी कमलबाई रामप्रसाद शिंदे यांचे गुरुवारी दुपारी दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 55 वर्षांच्या होत्या.
कमलबाई यांच्या पार्थिवावर लवूळ येथील स्मशानभुमीत गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू, दिर, जाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. आर्ट ऑफ लिव्हींगचे भागवत रामप्रसाद शिंदे यांच्या त्या मातोश्री होती. तर बालासाहेब शिंदे, बारीकराव शिंदे यांच्या त्या भावजई होत्या.
Friday 13th of May 2022 03:51 PM
