Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज वडवणीत विष्णू महाराज बांडे यांचा विनोदी भारुड कार्यक्रम

वडवणी  - वडवणी शहरातील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी आज मंगळवार रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम तथा सुप्रसिध्द विनोदी भारुडकार ह.भ.प.विष्णू महाराज बांडे यांचा तुफान लोकप्रिय व विनोदी असा भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी वडवणी पंचक्रोशीतील सर्व भाविक-भक्तांनी श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानप्रमुख ह.भ.प.अण्णा महाराज दुटाळ यांनी केले आहे. 

                             याबाबत अधिक माहिती अशी की, समस्त वडवणीकरांचे आराध्य दैवता असलेल्या शहरातील चिंचवण रोडवरील घनदाट हिरव्यागार व निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री.रेणुकामाता संस्थानाचा यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत व्यापक व भव्य अशा दिमाखदार स्वरुपात नुकताच संपन्न झाला आहे. विजयादशमी दिवशी सर्व वडवणीकरांनी सिमोल्लंघन करत आपली आराध्य दैवता श्री.रेणुकामातेचे मनोभावे दर्शन घेतले. व रावण दहन कार्यक्रमासही उपस्थिती दर्शवली होती. याच ठिकाणी आज मंगळवार दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री ठीक ८ वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम तथा सुप्रसिध्द असे विनोदी भारुडकार ह.भ.प.विष्णू महाराज बांडे यांचा तुफान लोकप्रिय व विनोदी असा भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच रात्री ठीक १२ वाजता दुध प्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी वडवणी पंचक्रोशीतील सर्व भाविक-भक्तांनी यांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानप्रमुख ह.भ.प.अण्णा महाराज दुटाळ यांनी केले आहे.

Monday 18th of October 2021 07:40 PM

Advertisement

Advertisement