Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

धारूर येथे युवकांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

किल्लेधारूर - धारूर शहरातील युवकानी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना भाई मोहन गुंड यांनी पक्षात येणाऱ्या काळात युवकाना संधी दिली जाईल असे सांगीतले

धारूर येथे युवकांनी शेतकरी कामगार पक्षात भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वा खाली धारुर येथील युवा कार्यकर्ते निलेश थिट्टे, सुरज चव्हाण, रेवण नखाते, शिवराम बोबडे,आकाश मस्के, अनंत घुगे, लहू मस्के, सुशील मस्के, अजय मस्के, विकास काजळे, योगेश अंधारे, सचिन मुंडे, झुबेर शेख, आकाश वैरागे, समाधान मस्के, राजाभाऊ मुंडे यांनी जाहीर प्रवेश केला या वेळी सर्वांचे अभिनंदन करुन  शुभेच्छा दिल्या,भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ भाई जयंत पाटील यांच्या सुचनेवरुन पक्षाच संघटन मजबूत करुन प्रभावीपणे शेतकरी प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी तरुणांना पक्षात संधी देणार असल्याचे मत शेकापचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केल, या वेळी भाई अमोल सावंत, ऑड निखिल बचुटे,भाई विलास मुंडे उपस्थित होते.

Wednesday 13th of October 2021 09:07 PM

Advertisement

Advertisement