Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

फळरोप वाटीका माजलगांव येथील मजुराचे थकीत तात्काळ द्या - गणेश थोरात

माजलगांव  - येथील कृषी अधिकारी कृषी चिकीत्सालय फळरोप वाटीका माजलगांव जि.बीड प्रक्षेत्रावर कामे करणाऱ्या दैनंदीन मजुराचे मागील १२ महीन्या पासुन मजुरी थकीत वेतन अदा केलेली नसल्याने मजुरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच चालु हंगामात सनसुदीचे दिवस असताना सुध्दा प्रशासनाला जाग येत नसल्याने मजुरांना अत्यंत वाईट दिवसाला सामोरा जावे लागत आहे. या प्रकरणात तात्काळ दखल घेवुन दि. ३०/०१०/२०२१ पर्यंत आमचे थकलेले पगारी अदा करण्यात याव्यात व आम्हाला दि. ०१/११/२०२१ च्या उपोषणास परावृत्त करावे अन्यथा आम्ही सर्व मजुर आपल्या कार्यालयासमोर दि. ०१/११/२०२१ पासुन आमराण उपोषणास बसणार आहोत तसेच आमच्या जिवीतास हनी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची दखल घ्यावी हि विनंती.  येथील कर्मचारी गणेश थोरात यांनी बीड जिल्हा कृषी अधिकारी यांना दि १२ रोजी  दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

Wednesday 13th of October 2021 09:02 PM

Advertisement

Advertisement