Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत मौजे असोला येथे सेंद्रिय शेती,महिला शेती शाळा उत्साहात

धारूर . प्रतिनिधी . धारूर  तालुक्यातिल असोला या ठिकाणी    येथे   खरिफ हंगाम  जून 2021 पासून सेंद्रिय शेती शाळेचे आयोजन करण्यात आले असून सदरील शेतीशाळा या  कृषी विभागाच्याआत्मा अंतर्गत होत आहेत ,प्रकल्प संचालक आत्मा बीड, श्री डी.जी.मुळे व तालुका कृषी अधिकारी श्री एस डी शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या आहेत  सदरील शेतीशाळा मध्ये आजतागायात एकूण पाच वर्ग झाले असून ,आजपर्यंत ,जैविक बीज प्रक्रिया ,अंडा अमिनो एसिड,दशपर्णी अर्क,जैविक बुरशी नाशके ,जैविक कीटक नाशक अश्या विविध निविष्ठा प्रतेक वर्गात प्रतेक्ष बनवून दाखवल्या जात असून त्याचा प्रतेक्ष वापर शेती शाळेत निविड झालेल्या महिला आपल्या शेतात करत आहेत, सेंद्रिय पद्धतीने अल्प खर्चात ही  या निविष्ठा कश्या प्रकारे वापरता येतात या विषयी मार्गदर्शन करण्यात येत असून, आत्मा विभागाचे , श्री ज्ञानेश्वर धस,संतोष देशमुख तसेच कृषी विभाग ,कृषी विज्ञान केंद्र,या ठिकाणचे अधिकारी सदरील शेतिषलेस उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत, ,सम्पर्क शेतकरी तथा जिल्हा शेतकरी समितीच्या सदस्या सौ.सविता बोबडे  या ही शेतीशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Saturday 25th of September 2021 08:27 PM

Advertisement

Advertisement