Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रितीरिवाज मानपानाला डावलून माजलगांवात अजय आणि वैष्णवी चा आदर्श शुभविवाह संपन्न

माजलगांव ( प्रतिनिधी ):- सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामकृष्ण सोंळके यांनी मुलीच्या आई वडिलांना कसलाच अर्थिक भार न देता  रितीरिवाज, मानपानाला डावलून आणि कसलाच हुंडा न घेता त्यांचे जेष्ठ चि.अजय सोंळके आणि चि.सौ.का.वैष्णवी शेजुळ यांचा आदर्श शुभविवाह माजलगांवात स्वखर्चाने करून समाजा समोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल सोंळके व शेजुळ  परिवाराचे सर्वस्तरातुन कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

            मुलीचे लग्न म्हटल की हुंडा,संसार उपयोगी साहित्य, घेणे मंगलकार्यालय,मंडप विद्युत रोषणाई बँड,डिजे ,मानपान आहेर जेवणावळी,असा लाखोचा खर्च मुलीच्या आई वडील यांना करावाच लागतो.आपण समाजात हुंडा न घेता काही नी  लग्न करून आदर्श निर्माण केले आहेत. परंतु माजी. मोहनराव सोंळके यांच्या शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामकृष्ण विठ्ठलराव सोंळके यांनी रितीरिवाजाना मानपान डावलून कसलाच एक रूपयाही हुंडा न घेता ,कसलेच संसार उपयोगी सामान न घेता,स्वखर्चाने,कोरोनाचे नियमांचे पालन करून  माजलगांव येथील केशवराव मंगलकार्यालयात दि.१८ जुलै २०२१ रविवार रोजी दुपारी १ वाजता  त्यांचे जेष्ठ चिंरजीव अजय सौ.अनिता रामकृष्ण सोंळके यांचा शुभविवाह चि.सौ.का.वैष्णवी सौ.मीनाताई संजयराव शेजुळ रा.टाकरखेड ता.चिखली जि.बुलढाणा यांचा शाही आदर्श शुभविवाह करून समाजा समोर मोठा आदर्श निर्माण केल्या बद्दल सोंळके आणि शेजुळ परिवाराचे सर्वस्तरातुन कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या आदर्श शुभविवाहस माजी आ.मोहनराव सोंळे,माजी.आ.राधाकृष्णन होके पाटील, भाजपाचे नेते रमेशराव आडसकर, धर्माधाय आयुक्त उस्मानाबाद चे पाईकराव,आरूण राऊत,  सभापती संभाजी शेजुळ,विजयकुमार सोंळके, प्रतापराव सोंळके, व्याख्याते प्रा.प्रदिप सोंळके,ज्ञानेश्वर मेंडके,अँड अनिलराव सोंळके, तुकाराम येवले,दिपक मेंडके, विनायक रत्नपारखी, कल्याण कदम,दिपक जाधव,दत्ता महाजन,सुनील खंडागळे, सह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व परिसरातील लोक उपस्थित होते.

Tuesday 20th of July 2021 09:02 PM

Advertisement

Advertisement