Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

आषाढी एकादशी निमित्त संत तुकोबाराय मंदिरास अकरा हजार फुलांची आरास

केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा दि.२० जुलै रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराजांची आणि विठ्ठल-रखुमाईची महापूजा संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य  वारकरी महामंडळाचे मराठावाडा विभागीय अध्यक्ष   महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आली. त्याच बरोबर हजारो फुलांच्या साह्याने मंदिरातील गाभाराआणि बाहेरील भाग सजवला होता. अकरा हजार फुलांच्या सजावटीसाठी लागणारी फुले सोनिजवळा येथील  हनुमंत गायकवाड यांनी दिली. कोरोणामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेत मंदिर प्रशासनाने शासकीय नियम न मोडता आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला. मंदिरातील फुलांची सुरेख सजावट महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अमोला महाराज, अशोक महाराज , जनार्धन महाराज, हनुमंत महाराज शिरसट,  गणपत पांचाळ, तुकाराम कापसे,पारेकर बप्पा यांनी केली.
      " दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे 'बा' विठोबाचे दर्शन व्हायचे परंतू कोरोणामुळे मागच्या वर्षी पासून दर्शन नाही. यामुळे मनाला हुरहूर वाटत आहे. आषाढी निमित्त श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे  फुलांचा आरास करून मंदिर सजावट व अभिषेक सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न केला. अशी प्रतिक्रिया यावेळी संत तुकोबाराय पावनधाम संस्थान अध्यक्ष  तथा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ ,मराठवाडा विभाग अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री  यांनी दिली.

Tuesday 20th of July 2021 08:01 PM

Advertisement

Advertisement