Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शिक्षणात मातृभाषेची भूमिका महत्वाची -डॉ मधुश्री सावजी

केज (प्रतिनिधी) : विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थान च्या प्रांताध्यक्षा व अखिल भारतीय शिक्षण संस्थानच्या मंत्री म्हणून दायित्व असणाऱ्या डॉ. मधुश्री संजीव सावजी संभाजीनगर , श्रीमती सविता ताई कुलकर्णी,  विश्वस्त सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, संभाजीनगर यांनी केज येथे दि.२० जुलै रोजी मंगळवार पेठ येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे सदिच्छा भेट दिली . यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शिक्षणात मातृभाषेचे भूमिका महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
    यावेळी दीपाताई काटे ,श्रीमती खंदारे , श्रीमती जयाताई कोकीळ , श्रीमती देशपांडे , कुलकर्णी , श्री. गदळे जी.बी(सहसचिव, जीवन विकास शिक्षण मंडळ केज) ,विलासराव जोशी, सदस्य जिवन विकास शिक्षण मंडळ,केज श्री. उपेंद्र कोकीळ, सदस्य जीवन विकास शिक्षण मंडळ केज, श्री तोषनीवाल ,प्रसाद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
 एकत्रीकरणात नवीन शैक्षणिक धोरण, महिला प्रबोधन, बालिका शिक्षण व देवगिरी प्रांत भर विद्या भारती कडून होत असणाऱ्या शैक्षणिक कार्याबद्दल चर्चा झाली, शिक्षणात मातृभाषेची भूमिका, महत्व यावर चर्चा झाली .सरस्वती  पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आलेल्या पाहुण्यांचा परिचय श्री मंगरूळकर मेघश्याम यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक  वसंत शितोळे  यांनी मानले.

Tuesday 20th of July 2021 07:58 PM

Advertisement

Advertisement