Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

नेकनूर परिसरातील ३० गावामध्ये दररोज १०० झाडे लावून जगवण्याचा संकल्प

नेकनूर -  वर्षभरापूर्वी एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी नेकनुर सह परिसरात बीजरोपण ,वृक्षारोपण करीत झाडांचे महत्व अधोरेखित केले .कोरोना काळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवल्याने या मोहिमेला आता अनेक ठिकाणी उस्फूर्त मिळत आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या वृक्ष मोहिमीला आता अनेक गावा गावांतून प्रतिसाद मिळत असल्याने आता हरित गावे हा उपक्रम राबविण्यात सुरवात केली असून याची सुरवात आज कळसंबर येथून झाली.  ग्रामस्थांनी आज वड, पिंपळ , लिंब यांचे रोपण करून जतन करण्याचा वसा घेतला केंद्रे सरांनी पिंपळाची लिंबा रोपे उपलब्ध करून दिली तर ग्रामस्थांनी वडाची बुंदे आणली वर्षापासून सुरू असलेल्या या मोहिमेचे आता गावोगावच्या सहभागाने खऱ्या अर्थाने फलित झाले आहे

    काही दिवसासाठी एकदा अधिकारी नेकनूर ठाण्यात येऊन आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत नेकनूर सह परिसरात एक मोठी वृक्ष लागवडीची मोहीम उभारतच नव्हे तर ती सत्यात उतरवत डोंगर माथ्यासह अनेक रस्त्यावर स्वखर्चाने वृक्ष लागवड सुरूच आहे .गेल्या वर्षी डोंगरमाथ्यावर ७५००० बीजरोपणा सह, नेकनूर बाजरतळ ,चाकरवाडी मांडवखेल भंडारवाडी येथे हजारो झाडांची लागवड आणि बहरदार आलेले झाडे पाहून वृक्षलागवडीसाठी या वर्षी हरित गावे या मोहिमेचा संकल्प एपीआय लक्ष्मण केंद्रे, पत्रकार, मॉर्निग टीम आणि वृक्षप्रेमी यांनी घेतला आहे. नेकनूर ठाणे अंतर्गत ३० गावांमध्ये १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एका महिन्याच्या काळामध्ये दररोज १०० या प्रमाणे ३००० झाडे लावून ते ग्रामस्थांच्या सहकार्याने जोपासण्याचे काम हाती घेत गावे हरित या मोहिमेच्या माध्यमातून संकल्प  हाती घेतला असल्याने नेकनूर ठाण्याच्या सपोनि लक्ष्मण केंद्रे यांचा हा प्रेरणादायी उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

       हाती घेतलेल्या एखाद्या संकल्पनेला साकारताना अडचणी असतात मात्र यातून इच्छाशक्तीच मार्ग दाखवते बिझी शेड्युल असतानाही निसर्गाशी जवळीक ठेवत गेल्या वर्षी १५ जूनला कुटुंबीयांसमवेत बीजरोपणाची मोहीम हाती घेतलेल्या एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी अनेकांना या मोहिमेचा भाग बनवला . यातून बिजांकुर, वृक्षप्रेमी ग्रुप उभा राहिला यातून मांडवखेल, रत्नागिरी, भंडारवाडी, कपिलधार , मांजरसुंबा येथील ओसाड डोंगरावर तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने ७५००० बीजांचे रोपन करण्याचा मोठा टप्पा पार केला. गेल्या वर्षी जूनपासून सुरू झालेल्या वृक्ष लागवडीसाठी वृक्षप्रेमी, बीजांकुर  नित्याने डोंगरदऱ्यात वर्दीतील वृक्षप्रेमी सपो नी लक्ष्मण केंद्रे यांच्या संकल्पनेने कपिलधार, मांडवखेल, रत्नागिरी ,भंडारवाडी येथील बीज रोपणाचे रोपट्यात रूपांतर झाले त्यांतर नेकनुरचे बाजारतळ , असो की ईदगा मैदान, माडवखेल, चाकरवाडी  रस्त्यावरील वृक्षारोपण केलेली झाडे बहरल्या नंतर कपिलधार आणि कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ,आणि नेकनूर सीतादेवी मंदिर परिसरात वडाच्या फांद्या सह पिंपळ ,चिंच या झाडांची लागवड केली. भविष्यात येथील रस्ते हिरवा शालू पांघरतील ही झाडे जगवण्यासाठी वृक्षप्रेमी ,बीजांकुर ग्रुप प्रयत्नशील असेल परंतु सपोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या पुढाकाराने बालाघाटावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची चळवळ उभा राहत असल्याने भविष्यात येथील डोंगर माथ्यासह अनेक रस्ते हिरवेगार झाली आहेत.

Monday 19th of July 2021 08:28 PM

Advertisement

Advertisement