Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

अंबाजोगाई  - येथील जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाने वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे वतीने वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.पर्यावरण दिनानिमित्ताने जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ते राजीव गांधी चौक रस्त्याच्या एका बाजुने ७५ विविध वृक्ष रोपांची श्रमदानाने दोन सत्रात लागवड केली.पहिल्या सत्रात माजी आमदार पृथ्विराज साठे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव सिरसाट व ग्रामीण विकास मंडळाचे (बनसारोळा) अध्यक्ष एस.बी.सय्यद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.दुसऱ्या सत्रात अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,सामाजिक वनीकरणाचे अधिकारी मोहिते,अंबाजोगाई पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी,वनरक्षक मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव शिवाजीराव खोगरे,श्रीरंग आबा चौधरी,शरद हरबाजी देशपांडे,प्रा.सोमनाथ पोखरकर,रमाकांत सेलमूकर,दयानंदराव देशमुख,वसंतराव नाईक आश्रमशाळेचे सहशिक्षक नागनाथ तोंडारे,शिंदे सर,पांचाळ सर,राठोड सर त्याच बरोबर जयप्रभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी पवार,मल्हारी घाडगे,बबन मस्के,सिद्राम गायकवाड,बालाजी कांबळे,गणेश सोनवणे आदी शिक्षकवृंद,पत्रकार शिवकुमार निर्मळे,रोटरी क्लबचे जगदीश जाजु,कुलकर्णी सर, सावंत सर,सत्वधर गुरूजी आदी शिक्षक बांधवांनी श्रमदान करून वृक्ष लागवड केली.जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाने आजपर्यंत पर्यावरण दिनानिमित्त कुंबेफळ येथील रस्त्याच्या बाजूला,जयप्रभा माध्यमिक विद्यालय,कुंबेफळ,स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालय,अंबाजोगाई,रघुनाथराव मुंडे माध्यमिक विद्यालय,वरवटी,यशवंतराव चव्हाण चौक सार्वजनिक स्मशानभूमी,आदर्श कॉलनी येथील खुली जागा,ज्योतीनगर,बोधीघाट स्मशानभूमी,उंदरी ग्रामपंचायत कार्यालय,साधु शिवरामपुरी मठ संस्थान वरपगाव,कापरेवाडी राज्य रस्ता क्र.६४ आदी विविध ठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून ट्रॅक्टरने नियमित 

पाणी देवून हे सर्व वृक्ष जिवंत ठेवले आहेत हे विशेष होय.यापूर्वी जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाने "वातावरणातील बदल व त्याचा परिणाम" या विषयावर स्मरणिका प्रकाशित केली आहे.तसेच मागील दोन वर्षांत याच विषयावर मंडळाचे सचिव शिवाजीराव खोगरे यांनी अनेक ठिकाणी 36 व्याख्याने ही दिली आहेत.

Thursday 17th of June 2021 08:31 PM

Advertisement

Advertisement