Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान करून साजरा केला स्वाभिमानी दिन

अंबाजोगाई -:
"माझा नेता, माझा स्वाभिमान; माझं रक्तदान" या घोषवाक्याचा वापर करीत रक्तदान करुन येथील वंचीत बहुजण आघाडीने स्वाभिमान दिन साजरा केला.
        अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून स्वाभिमानी दिन साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कोवीड सारख्या अशा कठीण प्रसंगी आपल्या स्वाभिमानी नेत्यासाठी आणि रुग्णालयाच्या मदतीसाठी धावून येणारे हे कोरोना योद्धे आपली मनातील भीती दूर सारून सुरक्षिततेने रक्तदान करून इतरांच्या मदतीसाठी पडणे हे खूप अभिमानास्पद काम या रक्तदात्यांनी केले . 
या प्रसंगी लखन वैद्य , डॉ दत्ता चिकटकर ,समीर वेडे ,गोविंद मस्के, अजय वाघमारे , केतन ताटे , अमोल बचाटे , सुजित वेडे , यशपाल ठोके , विशाल कांबळे , अशोक कचरे , प्रकाश हतागळे, अशोक गडसिंगे , शुभम रोडे, सचिन तरकसे ,आदित्य पौळे, मंगेश दासूद ,सतीश कांबळे, समरदीप कसबे,अनिल ठोके,रानबा जोगदंड, गुड्डू जोगदंड , मयूर कांबळे , स्वप्निल हातागळे , संकेत हातागळे , सुशीलकुमार धीमधीमे , अमोल वेडे, रत्नदीप सरवदे, अजय सरवदे , लक्ष्मण कसबे , नवल कचरे , समर कसबे , विकास हिरवे , शुभम मस्के , मनोज तायडे , व अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदानासह शिबिरात सहकार्य केले. 
 यावेळी राज्याचे नेते डॉ नंदकिशोर सोमवंशी ,तालुका प्रवक्ता गोविंद मस्के, शहराचे अध्यक्ष अमोल हातागळे ,युवा नेते समीर वेडे,लखन वैद्य, अक्षय भूंबे , ब्रिजेश इंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन तथागत युवा मंच भीम नगर परळीवेस वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईचे प्रमुख नितीन सरवदे , समीर वेडे, लखन वैद्य , केतन ताटे , महादू जोगदंड यांच्या वतीने करण्यात आले होते.

Wednesday 12th of May 2021 07:56 PM

Advertisement

Advertisement