Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ॲट्रासिटीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

धारूर : तालुक्यातील आरडवाडी फाट्याजवळ राहणारे  श्रीराम विठ्ठल माने, अशोक विठ्ठल माने आणि विठ्ठल अर्जुन माने यांच्या विरोधात संजय हरिभाऊ भालेराव यांनी २५ एप्रिल रोजी धारूर पोलीस ठाण्यात मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून तीघां पिता- पुत्रांवर ॲट्रासिटी ॲक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 आरोपींनी या प्रकरणात ॲड. संस्कार नामदेवराव शिनगारे यांच्यामार्फत  जिल्हा व सत्र न्यायाधीश, माजलगाव यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यात ॲड. संस्कार शिनगारे यांनी प्रभावी मांडणी केल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश देशमुख यांनी संबंधितांना अटकपूर्व जामिन मंजूर केला. आरोपींतर्फे ॲड. संस्कार शिनगारे यांना बाजू मांडताना ॲड. लहु गवते यांनी सहकार्य केले.  या प्रकरणात बजरंग माने, विठ्ठल रुद्रे, शेषराव मस्के, प्रकाश दगडू माने आदींनी सहकार्य केले.


Wednesday 12th of May 2021 07:24 PM

Advertisement

Advertisement