Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

दादासाहेब मुंडे ची बीड नियोजन समिति वरुण हकालपट्टी करा- संभाजी ब्रिगेड

   माजलगांव -  मराठा आरक्षण संदर्भात जो निर्णय देण्यात आला आहे, या निर्णयाचा मराठा समाजाकड़ून जाहिर निषेध करण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या भावना दुखवलेल्या असताना दुःखावर मीठ रगडन्याच काम बीड जिल्ह्यातील दादासाहेब मुंडे या व्यक्तिने केले आहे. दादासाहेब मुंडे हा बीड जिल्हा नियोजन समिति वर काम करत असून दादासाहेब मुंडे यांनी दोन समजामध्ये जातीय तेढ़ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोविड १९ या महामारी मुळे शांत असलेला मराठा समाज यांच्या भावना दुखवन्याच काम फेसबुक वर पोस्ट करून - तुम्ही आरक्षणात वाटा मागताय तुम्हाला वाटि पण मिळणार नाही, अशे वक्तव्य करून दादासाहेब मुंडे याने मराठा समाजाचा अपमान केलेला आहे.दादासाहेब मुंडे यांना बीड जिल्हा नियोजन समिति पदावरुन हकलन्यात यावे  अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी निवेदना द्वारे मा. मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे जिल्हाधिकारी जगताप बीड यांच्या मार्फत करण्यात आले आहे. निवेदन हेCM@MAHARASHTRA.GOV.IN वर पाठवन्यात आलेले असून जिल्हाधिकारी यांना whatsaap द्वारे देण्यात आले आहे.

Tuesday 11th of May 2021 08:25 PM

Advertisement

Advertisement