Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

राष्ट्रीय जनारक्षा महासंघाचे कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर पुरस्कारकर्ते आ.धस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित

आष्टी(प्रतिनिधी)-आष्टी तालुक्यातील सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय सामाजिक कार्य करीत असलेले व्यक्ती कोरोना महमारीच्या संकटात जीवावर उदार होऊन सामाजिक व इतर क्षेत्रात काम करत असलेल्याना 'कोविड योद्धा' पुरस्कार जाहीर केला आहे.यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी,डॉक्टर,पोलीस,कर्मचारी,

पत्रकार,नर्स,प्रयोग शाळा अधिकारी यांचा राष्ट्रीय जनारक्षा महासंघाच्यावतीने सन्मान करण्यात आला.या प्रत्येकाला त्यांच्या कर्तव्यावर जाऊन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

             राष्ट्रीय जनरक्षा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  बाळासाहेब आगलावे, केंद्रीय महानिरिक्षक गोविंद गायकवाड,प्रदेशाध्यक्ष युनूस पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील कोरोना योद्धा पुरस्कार वितरण करण्यात आले. यामधील काहींना आ.सुरेश धस यांच्या हस्ते पुरस्कारार्थीना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बीड जिल्हाध्यक्ष किशोर साप्ते,जिल्हा सचिव नानासाहेब काकडे, तालुकाध्यक्ष प्रवीण कुमकर तालुका उपाध्यक्ष अमोल इंगळे आदी उपस्थित होते.मुख्याधिकारी निता अंधारे, डॉ. सुदाम जरे,डॉ.शरद मोहोळकर,डॉ. रामदास मोराळे,डॉ.राहुल टेकाळे,डॉ.सुषमा सुंबे,डॉ.रूपाली राऊत,डॉ.सुजय सोनवणे,पत्रकार प्रविण पोकळे,पत्रकार सचिन रानडे,पत्रकार सुनील पोपळे,पत्रकार अविशांत कुमकर पत्रकार अनिरुद्ध धर्माधिकारी,नगरसेवक शरीफ शेख,आरोग्य सेविका शेख अस्फिया,प्रयोगशाळा अधिकारी नागेश करांडे,सहाय्यक पो.नि.अरुण कांबळे,होमगार्ड रमेश भोसले, वॉर्डबॉय शशिकांत डोमकावळे,वरिष्ठ लाईनमन शिवाजी बापुराव गोरे या सन्मानार्थीचे या पुरस्कारात समावेश आहे.

Monday 3rd of May 2021 07:36 PM

Advertisement

Advertisement