Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

वसुंधरा मिञमंडळाने केली कोरोना चाचणी साठी आलेल्या नागरीकाना निवारा सोय

किल्लेधारूर (वार्ताहर)वसुंधरा मित्र मंडळाच्या वतीने   कोविड सेंटर येथे फळ वाटप कार्यक्रम करत असताना तेथील डॉक्टर व कर्मचारी यानी काही समस्या सांगितल्या त्यात एक प्रमुख म्हणजे पूर्ण  किल्लेधारूर तालुक्यातील कोरोना चाचणी करण्यासाठी आलेले रुग्ण यांना ज्या खिडकी समोरून फॉर्म व सर्व गोष्टीची पुर्तता करायची असते तेथे सावलीचा अभाव असल्यामुळे त्याचे अश्या कडक उन्हात प्रचंड हाल होत होते. त्यासाठी वसुंधरा मित्र मंडळाच्या सदस्यनी कोविड सेंटर येथे लोकांसाठी शेड नेट निवारा मारून दिले. त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वेळेस तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी वसुंधरा मित्र मंडळाच्या केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले. 

या वेळी उपस्थित रोहन हजारी, अनिल तिवारी, रवी कुंभार, प्रतिक तिवारी, विशाल सिरसट,आश्विन गुळवे,परविन माने   पवन तट, रमेश काळे, शुभम काजले,संतोष सोनटक्के, निखिल पाथरकर,धनराज निर्मळ,विठ्ठल गायसमुद्रे   गणेशदेवा पुजारी, जिजा सिरसट, जयराज तिवारी, आकाश तिवारी,राहुल शिरसाट , प्रसाद जवकर,विशाल सराफ,अजय गायसमुद्र'विशाल तिवारी, संतोष भारस्कर,आमेर सय्यद, सलमान तांबोळी, महादेव राऊत हे उपस्थित होते

Monday 3rd of May 2021 07:35 PM

Advertisement

Advertisement