Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शेत वाटणीवरुन सख्या भावाचे डोके फोडले

अंबाजोगाई  - वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा मागणार्‍या भावाच्या डोक्यात दगड मारुन त्यास जखमी केल्याप्रकरणी भावाविरुध्द अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 20 फेबु्रवारीला नागझरी येथे ही घटना घडली.

दत्ता संदिपान देशमुख (40,रा.समतानगर,परळी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी सात वाजेच्या सुमारास त्यांनी नागझरी येथे राहणारा त्यांचा भाऊ विशाल याची भेट घेतली. नागझरी येथील वडिलांचे घर तसेच मोहा येथील शेत वाटणीचा हिस्सा मागीतला. यावर संतापलेल्या विशाल देशमुखने शिवीगाळ सुरु केली. ‘तुझा हिस्सा मी देणार नाही’ म्हणत दत्ता यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी करत काठीने मारहाण करुन धमकी दिली. यावरुन विशाल देशमुखविरुध्द गुन्हा नोंद झाला.

Monday 22nd of February 2021 08:24 PM

Advertisement

Advertisement