Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तरुणाला मारहाण;दोघांवर गुन्हा

अंबाजोगाई  - गाडीला टोपल्याचा धक्का लागल्याच्या कारणावरुन आईला शिवीगाळ करणार्‍यास शिवीगाळ करु नका असे समजून सांगणार्‍या तरुणास दोघांनी काठी,विटा व लाथाबुक्क्याने मारहाण केली. यात तो तरुण जखमी झाला. रविवारी (दि.21) तालुक्यातील खापरटोन येथे ही घटना घडली.

सिध्देश्वर बालाजी केंद्रे (21,रा.खापरटोन) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीनुसार, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरासमोरील बोळरस्त्यावर त्याची आई कोंडाबाई यांच्याकडील टोपल्याचा लहुदास केंद्रे व शिवाजी केंद्रे याच्या वाहनास धक्का लागला. यावरुन त्यांनी कोंडाबाईंना शिवीगाळ केली.यावेळी सिध्देश्वरने शिवी देवू नका,असे संबंधितांना सांगीतले.यावर संतापलेल्या दोघांनी लाथाबुक्क्याने मारहाण सुरु केली. लहुदासने डोक्टात विट मारुन दुखापत केली तर शिवाजी केंद्रे याने हातावर काठी मारुन आमच्या नादाला लागलास तर जिवे मारु अशी धमकी दिली. यावरुन दोघांविरुध्द बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Monday 22nd of February 2021 08:23 PM

Advertisement

Advertisement