Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शिवनेरी ते सांगवी पाटण सात वर्षापासून पायी ज्योत घेऊन येणारा महाराष्ट्रातील शिवरायाचा मुस्लीम मावळा 

आष्टी(प्रतिनिधी)-आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील उच्चशिक्षित युवक समीर शेख हा गेल्या सात वर्षापासून शिवनेरी ने सांगवी पाटण ज्योत घेऊन येत आहे.तो सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देत असून त्याच्या जोडीला युवकांची देखील जाती पातीचे दावे तोडुन एकत्र येऊन एकतेचा संदेश देतात. 

              दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण त्याच्यासोबत गावामधील 50 मावळे गेले होते.शिवनेरी ते सांगवी पाटण दोनशे किलोमीटर अतंर एक रात्र आणी एकदिवसामध्ये पार करून थेट गावामध्ये ज्योत आणली.त्यामुळे सांगवी पाटण,महाराष्ट्रात एकमेव असा मुस्लिम युवक समीर शेख यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.त्याच्या या पायीज्योतीत गावातील अजय मरकड,राघव खिलारे,अमीत गवारे,अनंत खिलारे,अजय वाघमारे,सुमीत भगत,शिवराम खिलारे,अमोल खिलारे,कृष्णा भोसले,शुभम भोसले,रोहीत भोसले,रोहीत मरकड,अकुंश फुलमाळी,अक्षय,खिलारे,हरि खिलारे, तुषार खिलारे,हरी भोसले यासह पन्नास मावळे सोबत होते.शिवरायचे विचार माझ्या कायम मनात असतात.ते माझे दैवत मानतो.एवढच नव्हे तर शिवरायांच्या महाराष्ट्रात मला हा मान मिळतो याचा मला गर्व असुन मी सात वर्षापासून गावातील मुलांच्या सोबतीने आणि माझ्या पुढाकाराने शिवनेरीवरून पायी ज्योत आणतो. शिवनेरीवर गेल्यावर मुस्लिम मावळा आहे.समजताच माझा मान सन्मान करून आमच्या संपूर्ण टिम चे राहणे खाणे झोपणे ही सगळी व्यवस्था तेथील लोक करतात. शिवरायाचा मावळा असल्याचा मला अभिमान असुन कायम मी पायीज्योत घेउन येणार असल्याचे त्याने  सांगितले.

Monday 22nd of February 2021 08:22 PM

Advertisement

Advertisement