Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्याची हेळसांड

केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील आनंदगाव येथील शेतकरी रामकृष्ण शंकर गायकवाड यांचा सोयाबीन पिकाचा 2018 मध्ये  विमा मंजूर झाला मात्र विमा कंपनीकडून त्यांना खात्यावर अद्याप पर्यंत ही पैसे पाठवले नाहीत. शेतकरी अनेक वेळा विमा कंपनीच्या कार्यालयात, तहसील कार्यालय, कृषी विभाग कार्यालयाकडे खेटे मारून आले मात्र टोलवाटोलवी केली जात आहे. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता बँक खात्याला आधार लिंक करा असे सांगितले जाते मात्र बँक खाते आधार लिंक आहे. सबंधित खात्यावर येणारे सोयाबीन विम्याची रक्कम अद्यापपर्यंत मिळाली नाही वृद्ध शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. औषध उपचारासाठी पैसे नाहीत अशी व्यथा शेतकरी गायकवाड यांनी सांगितली. सध्या परिस्थिती चे संकट आणि विमा कंपनी कडून होणारे शेतकऱ्याची हेळसांड जिल्हाधिकार्‍यांनी थांबवावी अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे पैसे तात्काळ खात्यावर जमा करावेत अशी मागणी शेतकरी गायकवाड यांनी केली आहे.
विमा मंजूर झाला मग पैसे गेले कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे प्रशासनाने याकडे लक्ष घालून अशा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Monday 22nd of February 2021 02:36 PM

Advertisement

Advertisement