Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

गारपिटीने केज तालुक्यातील शेतकऱ्यावर संक्रांत

केज : दिनकर जाधव 
    सतत दोन दिवस चाललेल्या अवकाळी आणि गारपिटीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पिक वाया गेली असून शेतकऱ्यांच्या हाताला आता काहीच लागत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नैराश्येचे वातावरण पहावयास मिळत आहे.

       यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्गामध्ये खुशीचे , आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत होते. त्यामुळे रब्बीचे पिके जोमात आलेले असताना निसर्गाची अवकृपा पुन्हा शेतकऱ्यांना पहावयास मिळाली आहे. कारण अचानक आलेल्या अवकाळी पावसा मध्ये गारपीट चे प्रमाण अधिक असल्याने पिकांची नासाडी झाली असून संपूर्ण पिके नासली गेले आहेत , खराब झाली झाले आहेत. त्यामुळे आनंदी- आनंदातअसलेला शेतकरी पुन्हा निराशेच्या गर्तेत गेल्याचे चित्र तालुक्यांमध्ये पहावयास मिळत आहे. कारण टरबूज , गहू, ज्वारी , हरभरा , कांदा , झेंडू ,  मिरची , कोबी सह अनेक पिके पुर्णपणे खराब झाली आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची सर्वे करून सरकारकडून काही मदत होते का नाही ? हीच एक आशा आता शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.

Monday 22nd of February 2021 02:35 PM

Advertisement

Advertisement