Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

योगेश्वरी विद्यालयात शिवजयंती साजरी

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) येथील श्री . योगेश्वरी नूतन विद्यालयात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव गायकवाड उपस्थित होते . व्यासपीठावर पर्यवेक्षिका ए .आर. पाठक यांची उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक एस.के. निर्मळे होते .

श्री .गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगितला .

सुरुवातीला मान्यवरांनी छात्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अमृत महाजन यांनी सर्वांचे आभार मानले . यावेळी शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते .

Saturday 20th of February 2021 08:49 PM

Advertisement

Advertisement