Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित विद्यानिकेतन मार्गदर्शन केंद्र आणि अनुसया संगणक प्रशिक्षण केंद्राच्यावतीने शुक्रवारी गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी वैजनाथराव भोसले , शेळी- मेंढी महामंडळाचे बालासाहेब दोडतले, प्राचार्य किसन पवार संजय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप करण्यात आले .

प्रारंभी संयोजक रामकृष्ण पवार यांनी प्रास्ताविक केले .पाहुण्यांचे स्वागत रामकिसन मस्के यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम निर्मळ यांनी केले . शेवटी प्रशांत पवार यांनी सर्वांचे आभार मानले .

Saturday 20th of February 2021 08:49 PM

Advertisement

Advertisement