Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

छत्रपती शिवाजी महाराज यांना पंकजाताई मुंडेंनी केले वंदन

मुंबई -  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मुंबई व परळी येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी छत्रपती शिवरायांना वंदन केले.

  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर, सुभाष सारडा उपस्थित होते.

  परळी येथे आज यशःश्री निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, जुगलकिशोर लोहिया, निळकंठ चाटे, सतीश मुंडे, उत्तम माने, पवन मुंडे, पापा गिते, राजेंद्र ओझा, महादेव इटके, सुशील हरंगुळे, विकास हालगे आदींसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Friday 19th of February 2021 08:31 PM

Advertisement

Advertisement