Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

रोजगार हमी योजनेतील मजुरांची खाते राष्ट्रीयकृत बँकेतच उघडा सभापती सविताताई मस्के यांची मागणी

 गेवराई  - तालुक्यातील बहुतांश गावात रोजगार हमी योजनेत कागदोपत्री कामे उरकून मोठी अफरातफर चालू असल्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावे मल्टीस्टेट निधी बँकेत खाते खोलून त्याद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या बँकेतील खात्यामुळेच योजनेतील भ्रष्टाचार बोकाळला आहे. तरी रोहयोतील संबंधीत मजुरांचे खाते हे राष्ट्रीयकृत बैंकेचेच असावे हा नियम अनिवार्य करावा, जेणेकरून संबंधीत मजुरांना त्यांच्या नावे जमा झालेल्या रकमेचा मेसेज जाईल व या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना लगाम लागेल असे निवेदन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना गुरुवारी दिले आहे.

   पुढे निवेदनात म्हटले आहे की, रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची जी खाते आहेत, ते बहुतांश बोगस आहेत. तालुक्यात मजुरांची बोगस खाते हे मल्टीस्टेट निधी बँकेत खोलून कागदोपत्री कामे करुन या बोगस खात्यावर मजुरीची रक्कम जमा करुन ती हडप केली जात असल्याची चर्चा जनतेतुन होत आहे. यामधील बहुतांश मजुरांना आपले खाते हे या बँकेत असल्याची कल्पना देखील नसते. या मल्टीस्टेटची अधिक चौकशी केल्यास रोजगार हमी योजनेतील बोगसगिरी नक्कीच समोर येईल. आपले खाते मल्टीस्टेट मध्ये आहे याची थोडीही भनक नसल्याने त्यांच्या नावे येणारे पैसे रोजगार हमीचे काम करणाऱ्या मोरक्याकड़े संबंधीत अधिकारी सुपूर्त करतात. ते निधी रक्कम बँकेमध्ये जमा होते, संबंधीत बोगस काम करणारे ती लाटतात. कारण मल्टीस्टेटमध्ये मेसेज जात नाही, तसेच मल्टीस्टेट चालकाशी या भ्रष्टाचारी लोकांचे संगणमत असते. या बँकेतील खात्यामुळेच रोहयोतील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचा आरोप सभापती मस्के यांनी केला असून रोजगार हमीमध्ये नावे असणाऱ्या मजूरांची खाते ही राष्ट्रीयकृत बैंकेतच असावे हा नियम अनिवार्य करावा, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होताच याची कल्पना या मजुरांना होईल. शिवाय शासनाला लुटणाऱ्या या टोळीला लगाम लागेल असे सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Thursday 18th of February 2021 07:50 PM

Advertisement

Advertisement