Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

संतप्त महिलेने पोलीस ठाण्यासमोरच अंगावर ओतले डिझेल

बीड - अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडून जवळपास दिड महिना झाला. युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही अद्याप मुलीचा शोध लागला नाही. नातेवाईकांनी पोलीसांकडे विचारपूस केल्यास प्रत्येकवेळी उडवा उडवीची उत्तरे देत प्रकरण मिटवण्यास सांगत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर पिडित मुलीच्या आईने युसूफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर येऊन अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.२०) गुरुवार रोजी दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील युसूफ बडगाव पोलीस ठाण्याच्या समोर घडली. सदरील महिला पोलीस ठाण्याच्या दिशेने धावत आली आणि अंगावर डिझेल ओतून घेतले. त्याचवेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

Thursday 20th of March 2025 04:31 PM

Advertisement

Advertisement