जवळगाव येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरूच
अंबाजोगाई - गंगामाऊली सोलर प्रायव्हेट लिमिटेड सोबत गट नं.211 मधील जमीनीवरील केलेला करार रद्द करा या व विविध मागण्यांसाठी जवळगाव येथील ग्रामस्थांचे गेल्या चार दिवसांपासुन तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे.
उपोषणार्थिंनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आम्ही जवळगाव येथील भूमिहीन शेतमजुर आहोत. येथील गट नं.211 मधील सरकारी जमीनी आम्ही सन 1981 पासुन वहिती करतोत व उदरनिर्वाह चालवतोत मात्र या जमीनीवर गंगामाऊली सोलर प्रा.लि. यांनी जमीनीवर केलेला करार रद्द करावा. बर्दापुर पोलिस स्टेशन येथे दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. गट नं.211 मधील वैयक्तीक क्षेत्र सोडून रिकाम्या जागेत सौर उर्जा प्रकल्प स्थालांतरीत करा, अशा विविध मागण्यांसाठी राजेभाऊ मुकुंद नामपल्ले, विजय लिंबाजी कांबळे, बाळासाहेब शेषेराव हारे, शंकर विठोबा आगळे, माणिक विठोबा आगळे, गोविंद तुकाराम मोहिमे यांच्यासह ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहे.
