फरार आरोपीच्या पोनिसांनी आवाळल्या मुसक्या
बीड (प्रतिनिधी): तालुकयातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात दादासाहेब खिंडकर व इतर सात जणांविरुद्ध अपहरण करुन खुनाचा प्रयत्न केल्या संदर्भगुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण आला व काही आरोपी पळून गेले होते त्यातील एक आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (दि.२०) रोजी बीडमध्ये अटक केली.
पोलीस ठाणे पिंपळनेर येथे (दि. १३) गुरुवार रोजी ओमकार ज्ञानोबा सातपुते यांच्या फिर्यादीवरुन दादासाहेब खिंडकर व ईतर सात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद झाला होता या गुन्हयातील आरोपी दादासाहेब खिंडकर हा पोलीसांना शरण आला होता परंतु इतर आरोपी हे पळून गेलेले होते त्या पळुन गेलेल्या आरोपींपैकी एक आरोपी योगेश उर्फ खोन्या बाबासाहेब चव्हाण रा. रानमळा, खांडवी ता. गेवराई हा कारागृहा जवळ थांबलेला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला माहीती मिळाल्याने पथकाने सदरील ठिकाणी त्याला झडप मारुन पकडले व पोलीस ठाणे पिंपळनेर यांच्या ताब्यात पुढील तापासाठी देण्यात आले. सदरील कारवाई नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, विष्णु सानप, चालक नितीन वडमारे यांनी केली आहे.
