गेवराईच्या प्रशिक्षणार्थी पीएसआयची आत्महत्या
पोलिस अकादमीच्या खोलीतच घेतला गळफास
गेवराई - गेवराई तालुक्यातील अर्धपिंपरीयेथील रहिवासीतथा नाशिकयेथील पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकसोमेश्वरभानुदास गोरे(२८) याने अकादमीच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.सोमवारी दुपारी ३.३० वाजता हीघटना घडली. आत्महत्येचे कारणअद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोमेश्वर गोरे याने त्याचे मामापांडुरंग पाटील यांच्याकडे राहूनशिक्षण पूर्ण केले होते. मागील वर्षीमार्च महिन्यात त्याचीएमपीएससीद्वारे पोलिस उपनिरीक्षकम्हणून निवड झाली होती. त्यानंतरप्रशिक्षणासाठी नाशिकलापाठवण्यात आले होते. मागील तीनमहिन्यांपासून गोरे नाशिक येथीलअकादमीत प्रशिक्षण घेत होता.
आई-वडील वीटभट्टी मजूर
सोमेश्वर यांचे कुटुंब अल्पभूधारकअसून त्यांच्याकडे दोन एकर जमीनआहे. त्यांच्या वडिलांनी मुलांनाशिक्षण देण्यासाठी १० वर्षांपूर्वी गावसोडून पुण्यात वीटभट्टीवर काम करतपै-पै जमवली हाेती. सोमेश्वरनेमामाकडे राहून बारावीचे शिक्षण पूर्णकेले होते. नंतर स्पर्धा परीक्षेच्यातयारीसाठी तो पुण्यात गेला.
