नवीन रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या
खा.बजरंग सोनवणे यांच्या मुंबईतील बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना, दोन्ही विभागाकडून घेतला आढावा
बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर या नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्व्हेक्षणाला निधी देण्यात आला असून सर्व्हेक्षणाच्या कामाला गती द्या, राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट असलेली कामे तातडीने पुर्ण करा, नवीन दोन रस्ते दर्जोन्नत करुन राष्ट्रीय महामार्ग करावेत अशा सुचना खा.बजरंग सोनवणे यांनी दिल्या.
दि.१७ मार्च रोजी दिल्ली येथील संसदेत बीड रेल्वे जंक्शन व रेलमार्ग कामांनी गती देण्यासाठी आवाज उठविला होता. यानंतर दि.१८ रोजी सरव्यवस्थापक कार्यालय, सीएसटी मुंबई येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सरव्यवस्थापक धरमवीर मीना, एस.एसग़ुप्ता, ए.के.पांडे, सीपीआरओ स्वप्नील निला, डीजीएम के.के.मिश्रा यांची उपस्थिती होती. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर या नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्व्हेक्षणाला निधी दिला असून आता तातडीने सर्व्हेक्षणाचे काम सुरू करावे, अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वेचे काम सुरू आहे. आता अहिल्यानगर ते बीडपर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी झालेली आहे. तर पुढील कामाला गती देऊन लवकरात लवकर परळीपर्यंतचे काम पुर्ण करावे, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामामुळे काकडवाडी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, कारेगाव, विघनवाडी, हिवरसिंगा, चऱ्हाटा, ढोलेवस्ती आणि इतर ठिकाणी सडक वाहतूक बाधित झाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि प्रवाशांना अडचणी येत आहेत. यासाठी या ठिकाणी तसेच बीड-परळी मार्गावरील आवश्यक ठिकाणी पुल बांधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या तर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बैठकीत केंद्रीय दळणवळण विभागाचे विभागीय अधिकारी फेगडे यांचेसह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सर्व मुख्य अभियंते, कार्यकारी अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी अहमदपूर-धायगुडा पिंपळा-अंबाजोगाई-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा या मार्गाला दुहेरी मार्ग करणे, लातूर-बर्दापूर-लोखंडी सावरगाव या मार्गासही दुहेरी मार्ग करणे, परतूर-माजलगाव-धारूर-केज-कळंब- येरमाळा-कुसळंब या मार्गातील अर्धवट कामे पुर्ण करणे, खरवंडी- आर्वी- ब्र. येळंब- न. राजुरी-बीड- वडवणी- परळी रस्ता पूर्ण करुन सुधारणा करणे, मांजरसुंबा ते चुंबळीफाटा मार्गातील अडथळे योग्य त्या उपाययोजना पुर्ण करून काम पुर्ण करणे, पैठण- पंढरपूर रा.मा. मधील मळेकरवाडी घाटामधे तातडीने डांबरीकरण करणे, चुंभळी व पाटोदा येथील अडथळे दूर करुन कामे पूर्ण करणे आदि विषयावर सविस्तर चर्चा झाली.
या मार्गांना दर्जोन्नतीचा प्रस्ताव :
पिठ्ठी-लिंबादेवी-गारमाथा-अंमळनेर-धामनगाव-टाकळी काझी, तर दुसरा उमापूर फाटा ते उमापूर-शेवगाव या दोन मार्गांना दर्जेन्नती करणे, या विषयावर बैठकीत चर्चा झाली असून या कामासाठी अधिकाऱ्यांनी सदरील प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करू, असे म्हटले. दोन्ही मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
धारूर घाटावर फोकस
धारूर घाटात अनेक अपघात होऊन प्रवाशांचे बळी गेलेले आहेत. सदरील घाटाचे काम व्हावे, यासाठी खा.बजरंग सोनवणे वारंवार पाठपुरावा करत असून या घाटासी पर्यायी मार्ग कामाला मंजूरी मिळालेली असून तातडीने निवीदा प्रक्रिया पुर्ण करावी आणि कामाला सुरूवात करून काम पुर्ण करावे, याबाबतही अधिकाऱ्यांना बैठकीत सुचना दिल्या.
दि.१७ मार्च रोजी दिल्ली येथील संसदेत बीड रेल्वे जंक्शन व रेलमार्ग कामांनी गती देण्यासाठी आवाज उठविला होता. यानंतर दि.१८ रोजी सरव्यवस्थापक कार्यालय, सीएसटी मुंबई येथे खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सरव्यवस्थापक धरमवीर मीना, एस.एसग़ुप्ता, ए.के.पांडे, सीपीआरओ स्वप्नील निला, डीजीएम के.के.मिश्रा यांची उपस्थिती होती. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर या नवीन रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्व्हेक्षणाला निधी दिला असून आता तातडीने सर्व्हेक्षणाचे काम सुरू करावे, अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वेचे काम सुरू आहे. आता अहिल्यानगर ते बीडपर्यंत रेल्वेची जलदगती चाचणी झालेली आहे. तर पुढील कामाला गती देऊन लवकरात लवकर परळीपर्यंतचे काम पुर्ण करावे, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामामुळे काकडवाडी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, कारेगाव, विघनवाडी, हिवरसिंगा, चऱ्हाटा, ढोलेवस्ती आणि इतर ठिकाणी सडक वाहतूक बाधित झाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि प्रवाशांना अडचणी येत आहेत. यासाठी या ठिकाणी तसेच बीड-परळी मार्गावरील आवश्यक ठिकाणी पुल बांधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या तर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बैठकीत केंद्रीय दळणवळण विभागाचे विभागीय अधिकारी फेगडे यांचेसह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सर्व मुख्य अभियंते, कार्यकारी अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी अहमदपूर-धायगुडा पिंपळा-अंबाजोगाई-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा या मार्गाला दुहेरी मार्ग करणे, लातूर-बर्दापूर-लोखंडी सावरगाव या मार्गासही दुहेरी मार्ग करणे, परतूर-माजलगाव-धारूर-केज-कळंब- येरमाळा-कुसळंब या मार्गातील अर्धवट कामे पुर्ण करणे, खरवंडी- आर्वी- ब्र. येळंब- न. राजुरी-बीड- वडवणी- परळी रस्ता पूर्ण करुन सुधारणा करणे, मांजरसुंबा ते चुंबळीफाटा मार्गातील अडथळे योग्य त्या उपाययोजना पुर्ण करून काम पुर्ण करणे, पैठण- पंढरपूर रा.मा. मधील मळेकरवाडी घाटामधे तातडीने डांबरीकरण करणे, चुंभळी व पाटोदा येथील अडथळे दूर करुन कामे पूर्ण करणे आदि विषयावर सविस्तर चर्चा झाली.
या मार्गांना दर्जोन्नतीचा प्रस्ताव :
पिठ्ठी-लिंबादेवी-गारमाथा-अं
धारूर घाटावर फोकस
धारूर घाटात अनेक अपघात होऊन प्रवाशांचे बळी गेलेले आहेत. सदरील घाटाचे काम व्हावे, यासाठी खा.बजरंग सोनवणे वारंवार पाठपुरावा करत असून या घाटासी पर्यायी मार्ग कामाला मंजूरी मिळालेली असून तातडीने निवीदा प्रक्रिया पुर्ण करावी आणि कामाला सुरूवात करून काम पुर्ण करावे, याबाबतही अधिकाऱ्यांना बैठकीत सुचना दिल्या.
Tuesday 18th of March 2025 08:07 PM