जीवनात पुढे जाण्यासाठी दृष्टी असली पाहिजे-जल संधारण अधिकारी मानसी जोशी
वडिलांचे छत्र हरवलेल्या मानसीने घेतली झेप, पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने गुणी कर्तृत्वाचा गौरव
अंबाजोगाई - गुणगौरव हा प्रेरणा व ऊर्जा देण्यासाठी असतो शैक्षणिक गुणवत्तेतूनच जीवनाचा विकास होतो सर्वांगीण विकास साधून जीवनात पुढे जाण्यासाठी दृष्टी असावी लागते असे मत धाराशिव येथील जलसंधारण विभागातील अधिकारी मानसी जोशी यांनी व्यक्त केले.
जलसंधारण विभागात वर्ग दोन अधिकारीपदी मानसी जोशी यांची निवड झाल्याबद्दल येथील पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने मानसी जोशी यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. आपल्या मार्ग दर्शनपर मनोगतात त्यांनी सांगितले की पालकांनी पाल्यासोबत गुणवत्ते संबंधी चर्चा केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी देखील जिद्द, चिकाटीने शिक्षण घेतल्यास घवघवीत यश प्राप्त होते समाजाच्या चांगुलपणासाठी योगदान देणाऱ्या कार्य कतृत्वाचा गौरव करण्यासाठी पेशवा प्रतिष्ठान सारख्या संस्था आहेतच ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे कठोर परिश्रम विनम्रता आणि मोबाईल पासून दूर राहणे ह्या गोष्टी घेतल्यातर यश आपल्या जवळच आहे असे सांगून त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेत आपले विद्यालयीन, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले त्याबरोबरच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या सरळ सेवेच्या भरतीप्रमाणे मराठवाड्यातच धाराशिव येथे जलसंधारण अधिकारी वर्ग दोन पदी आपली निवड झाली आणि मी माझी आई श्रीमती सुरेखा जोशी हिचे स्वप्न पुर्ण केले आपण लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली असल्याचे मानसी जोशी यांनी सांगितले.
यावेळी पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मानसी जोशी यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रतीक्षा जोशी,रोहिणी जड,कल्याणी कुलकर्णी,अनिता औटी, वर्षा मिरगे,प्रणिता पोखरीकर,प्रणिता सेलमोकर,सुरेखा जोशी,उज्वला गोस्वामी अविनाश जोशी,रमेश कुलकर्णी,पत्रकार प्रशांत बर्दापूरकर, राहूल देशपांडे,डॉ.महेश अकोलकर,पदमाकर सेलमोकर,दुर्गादास दामोशन,डॉ.प्रविण जोशी,विनायक गोस्वामी,संकेत तोरंबेकर,किरण गोस्वामी,केदार दामोशन,शिशिर हिरळकर,सराफ आदी उपस्थित होते.
