माजलगाव तालुक्यात भर दिवसा घरफोडी
माजलगाव - तालुक्यातील लहामेवाडी येथे भरदिवसा तीन घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी ९,४०,५०० रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याची घटना (दि. १७) सोमवारी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील सोमेश्वर आश्रुबा कापसे (वय ३३) रा. लहामेवाडी ता. माजलगाव हे घरास कुलूप लावून शेतात गेले असता अज्ञात चोरटयांनी सोमेश्वर कापसे यांचा भाऊ व आई वडील यांच्या तिघांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोने चांदीचे दागिने किंमत ५,९१,५०० रुपये व रोख रक्क्म ३,४९,००० रुपये असा एकूण ९,४०,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना (दि. १७) सोमवारी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माजलगाव ग्रामीण पोलीस कर आहेत.
