Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

दोन्ही सख्य्या भावांचे चोरटयांनी फोडले घर

आष्टी - तालुक्यातील उंदरखेल येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २,९८,००० रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याची घटना (दि. १५) शनिवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होऊ लागली अशातच आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील सुनील विठ्ठल वामन (वय ३९) व यांचा मोठा भाऊ बाबासाहेब विठ्ठल वामन यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १० ग्रॅम सोन्याची चैन किंमत २५,००० रुपये, २७५ ग्रॅम सोन्याची चैन किंमत ६२,५००० रुपये, २६ ग्रॅमचा राजीहार किंमत ६५,०००, २७ग्रॅमचे गंठण किंमत ६७,५००,९ ग्रॅमचे साखळी गंठण किंमत २२,५००, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी किंमत २५,०००,२ ग्रॅमची अंगठी ५०००, ७ ग्रॅमचे कानातील झुंबर व वेळ किंमत १७,५०० व रोख रक्कम ८००० रुपये असा एकूण २,९८,००० रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याची घटना (दि. १५) शनिवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत.

Monday 17th of March 2025 01:21 PM

Advertisement

Advertisement