Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अजित पवारांकडून विधान परिषदेसाठी संजय खोडके यांना उमेदवारी; संजय दौंड यांची संधी हुकली

मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागा झाल्या होत्या. यासाठी महायुतीकडून नावे जाहीर करण्यात येणार आहे. या पाच जागांसाठी भाजपच्या तीन, शिंदे गटाच्या एक आणि अजित पवार गटाला एक जागा देण्यात आली होती. अजित पवार यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. माजी आ. संजय दौंड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दौंड यांच्यासह अनेक इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळवी देखील करुन ठेवली होती. मात्र अजित पवार यांनी विधान परिषदेच्या एका जागेसाठी संजय खोडके यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खोडके हे अमरावतीचे नेते असून त्यांच्या पत्नी देखील राजकारणामध्ये असून आमदार आहेत.

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्याआधी भाजपने आपल्या तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अजित पवार यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे.  अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू होती. दरम्यान,  विधान परिषदेच्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाची बैठक पार पडली. अजित पवार यांनी संजय खोडके यांना संधी दिली आहे.

Monday 17th of March 2025 12:22 PM

Advertisement

Advertisement