Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ समोर- मनोज जरांगे

बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील लक्ष हटवण्यासाठी एकमेकांचे व्हिडिओ समोर आणले जात आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, राजकीय लोकं जर एखाद्या प्रश्नामध्ये घुसले तर सामजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सारख्या माणासांना अडचणी निर्माण होतात. हे लोकं मॅटर दाबण्यासाठी आतून ही व्हिडिओ बाहेर काढण्याची शाळा खेळू शकतात. मी तुझा व्हिडिओ दाखवतो, तु माझा व्हिडिओ दाखव, आता हे सुरू झाले आहे. थोड्या दिवसांत अनेकांचे व्हिडिओ समोर आणले जातील

..फडणवीस आरक्षण देणार म्हणून शांत

यापूर्वी बोलताना जरांगे म्हणाले की, महायुतीची सत्ता येऊन 4 तर मी उपोषण सोडून 1 महिना उलटून गेला आहे. आता ते काय करतो हे आम्ही बघत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याने आम्ही शांत आहोत. तुम्ही असे समजायचे नाही मग की आम्ही शांत आहोत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करणार तर आम्ही तुम्हाला वठणीवर आणू असा इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला आहे.

..तर अचानक आंदोलन

मनोज जरांगे दोन दिवसांपूर्वी म्हणाले की, सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनाही काही दिले नाही. कर्जमाफी नाही किंवा कर्जमुक्तीही नाही. त्यांनी गोरगरिबांच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला नाही. म्हणजे सरकारने केवळ गोड बोलून जनतेची मान कापली. त्यामुळे इथून पुढे कमी सांगायचे, कमी बोलायचे व अचानक आंदोलन करायचे या भूमिकेशिवाय सरकार आता ठिकाण्यावर येणार नाही. सरकारकडे जसा कावा आहे, तसा गरिबांकडेही आहे.

जातीयवादी नाही

मनोज जरांगे म्हणाले की, मी आरक्षणाची मागणी करत आहे म्हणून मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला जातीयवादी ठरवू नका. तुम्ही मागितले तेव्हा आम्ही तुम्हाला जातीयवाद म्हटले नाही. आमची केवळ गरिबांच्या लेकरांसाठी आरक्षणाची मागणी आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करत आहात, याचा अर्थ तुम्हीच जातीयवादी आहात.

Thursday 13th of March 2025 01:09 PM

Advertisement

Advertisement